पैगंबर कामत ते बाबुश- गोव्यातील शुद्धीकरणाचे वेगवेगळे प्रयोग!


Pic: ANI

मडगावच्या पैगंबर कामतांच्या आगळ्यावेगळ्या राजकीय शुद्धिकरणापासुन सुरु झालेल्या प्रयोगात आता बाबुशच्या शुद्धिकरणाने नवी उंची गाठली!
कानडी मुस्लिम मजुरांना घावकीत मडगावात आणुन त्यांची सरकारी हॉस्पिटलात बाळंतपणे काढुन, जन्मलेल्या कानडी मुस्लिमाला गोव्यात जन्मदाखला देऊन आपल्या मडगाव मतदारसंघात आपली राजकीय भविष्याची तरतुद करणारे पैगंबर बाब कामत याचं राजकीय सोय म्हणुन कुणीतरी शुद्धिकरण करून घेतलं!

पुढे त्यांनीच भाईंच सरकार पाडलं!

अश्या प्रयोगाने शुद्धिकरणाची क्षमता वाढणारच ना? त्यामुळे मधल्या काळात बरेच लोक आम्ही शुद्ध करून ती क्षमता अजुन वाढवली! आणि आलेल्या आत्मविश्वासातून परवा बाबुशला शुद्ध करून घेतला!

मधल्या काळात भाषेच्या मुद्द्यावरूनही कुणाही एकाला पूर्णपणे बरोबर आणि चुक म्हणण्यासारखी स्थिती नक्कीच नाही!

त्यामुळे ‘पैगंबर कामतांच्या वेळचा निर्णय बरोबर असेल तर बाबुशच्या वेळचा पण बरोबर आणि तो निर्णय चुक असेल तर काल-परवाचाही चुक’ असा “डकवर्थ-लुईस” चा (कधीही नं कळलेला) ढोबळ नियम लाऊन सामना संपवुन टाकलेला बरा!

जिथे आमदारालाच सूर्योदयाच्या वेळी माहीत नसतं की तो सूर्यास्ताला कुठल्या पार्टीत असेल,तिथे आपल्या डोक्याची कल्हई करून घेण्यात काय शहाणपण?

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *