शांततामय मार्गाने जमलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांवर राजस्थानात हल्ला


काँग्रेस शासित राजस्थान मध्ये बुधवारी शाखा भरवण्यासाठी जमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर योजनाबद्द पद्धतीने हल्ला करण्यात आला. नवलनगर पार्क येथे कार्यक्रमासाठी संघाचे स्वयंसेवक एकत्रित आले होते. काही समाजकंटकांच्या जमावाने तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात रा. स्व. संघाच्या काही तरुण आणि बाल कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे. ताबडतोब संघाच्या स्वयंसेवकांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार केली. पोलीस प्रशासनाने केवळ पाच जणांच्या विरोधात एफ. आय. आर. नोंदवला आहे पण प्रत्यक्षात 50 हुन अधिक लोकांच्या जमावाने हल्ला केला होता.

पोलीस अधीक्षक ममता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ल्याच्या प्रकरणात सद्दाम, शफी मोहम्मद, शाहिद या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचे पडसाद राजस्थान विधानसभेत ही उमटले. आमदार मदन दिलवार यांनी संबंधित प्रकरण विधानसभेत लावून धरले. राजस्थान भाजपच्या आमदारांनी काँग्रेस सरकारला विधिमंडळात धारेवर धरल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *