रामलाल जी ., भाजप आणि संघ :

रवींद्र मुळे, प महाराष्ट्र प्रांत : संपर्क प्रमुख (RSS)

नुकतीच काल पासून एक पोस्ट फिरायला लागली आणि संघाच्या प्रचार विभागाने अधिकृत पणे प्रसिद्ध केले की रामलालजी, जे संघटन मंत्री म्हणून भाजप चे आखिल भारतीय स्तरावर काम करत होते. त्यांनी त्या जबाबदारीतून स्वतः ला मुक्त करण्याची विनंती केली आणि संघाचे दायित्व पुन्हा स्विकारले. ते आता संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख झाले आहेत. गेली १३ वर्ष त्यांच्या कडे ही जबाबदारी ( पद नाही ) होती.
म्हणजे बरोबर २००५/६. पासून .जेंव्हा भाजप पराभूत झालेला होता तेंव्हा पासून. आज भाजप चा भरभराटीचा काळ आहे. केंद्रात सत्ता . अनेक राज्यात सत्ता. सर्वात मोठा पक्ष . विरोधी पक्षातील मंडळींचा ओघ भाजप कडे आहे . सहज मानवी स्वभाव म्हणून अशा वेळेस आपण तेथे असले पाहिजे वाटणे हे स्वाभाविक आहे .पण ही वेळ दुसऱ्याच्या हाती जबाबदारी सोपविण्याची योग्य वेळ आहे हे समजून दूर जाणे आणि पुन्हा संघ कार्यात मग्न होणे हे सामान्य मानवी स्वभावाच्या विपरीत आहे .पण हेच संघाचे त्याच्या कार्य पद्धतीचे वैशिष्टय आहे.
दीनदयाळ जी पूजनीय गुरुजी यांच्या कडे नेहमी तक्रार करायचे की क्यूँ मुझे इस झमेलमे डालते हो ? तेंव्हा पूजनीय
गुरुजी त्यांना हसत सांगायचे ,आप को जब तक इस क्षेत्र का लगावं नही लगता तब तक ही आप वही रहोगे.ऐसा हुआ (लगावं हो गया ) तो मै आपको वापिस बुला लुंगा!
( अर्थात रामलालजी हे. कर्तव्य पूर्तीचा भावनेतून परत येण्यची इच्छा व्यक्त करतात न की त्यांना परत बोलावले आहे.)
संघाचे प्रचारक या मनस्थितीत असतात. प्रसिध्दी आणि सर्व माध्यमे
यांचे लक्ष राजकीय घडामोडी कडे असते त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही एक मोठी राजकीय घडामोड असते मग तर्क वितर्क लढवले जातात.
आणि त्यात हा उच्च ध्येयवादी जीवनाचा विचार वाहून जातो. अर्थात सध्याची मूल्य इतकी घसरली आहे की अशा गोष्टी दंत कथा ठरव्यात! आणि मग खोटी कथानक पण तयार होतात . पण एक चांगले झाले बदलत्या काळात आवश्यक असल्यामुळे त्यांचे पत्रच प्रसिद्ध केले गेले.
त्यांच्या एका कृतीचे एकाच वेळेस अनेकांना बोध घेता येतील.
स्वयंसेवक आणि कार्यकर्ते (संघाचे )यांच्या दृष्टीने पण हे उदाहरण समजून घेवुन आपल्या मार्गक्रमणा चे स्मरण होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. समाजातील अनुकूलता , झालेले सर्वत्र राजकीय परिवर्तन यातून आम्हा अनेकांना राजकीय क्षेत्राबद्दल कुतूहल उत्सुकता निर्माण होत असते आणि लक्ष विचलित होणे स्वभाविक असते अशा वेळेस रामलाल जी यांचा निर्णय भानावर आणणारा आहे. पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना । हे केवळ म्हंणण्यासाठी गीत नाही तर कृतीत उतरवायचे तत्वज्ञान आहे, हे ह्या निमित्ताने माननीय रामलाल जी यांच्या या कृतीतून अधोरे खित झाले आहे. आपल्या धेया प्रती अविचल होण्यासाठी, संघ कार्याची आवश्यकता लक्षात येण्यासाठी, कार्यपद्धती वरचा विश्वास वाढण्यासाठी राजकीय क्षेत्र हे एकमेव नाही, तर अनेक समाज जीवनातील क्षेत्रा पैकी एक आहे! त्यामुळे त्याचे महत्व तेवढेच मर्यादित आहे ह्या संकल्पनेवर विश्वास दृढ होण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्ते ,स्वयंसेवक यांच्या साठी ही कृती खूप अर्थ पूर्ण आहे.
दुसरीकडे आमच्या भाजप कार्यकर्ता मित्रांसाठी पण ही घटना महत्वाची आहे. काही जणांना प्रामाणिक पणें असे वाटत असते( आणि ते खरे पण असते) आम्ही पक्षासाठी इतका त्याग केला आता आम्हाला हे पद मिळाले पाहिजे . आमच्या वर अन्याय होतो आहे हे मागून पुढे गेले वगैरे वगैरे ! ही जी सगळी मांडणी केली जाते त्यांना हे लक्षात येईल की हा पक्ष अशा अनेक त्यागी तपस्वी कार्यकर्त्यांच्या रक्त आणि घामा च्या सिंचनातून उभा राहिला आहे. राष्ट्रवादी विचाराच्या पक्षाला उभे करणे हे लोकांचे वयक्तिक प्रश्न घेवून पक्ष उभे करण्याचा प्रयत्न पेक्षा फार अवघड आहे. त्यासाठी असे अनेक कार्यकर्ते खपतात तेंव्हा हे दिवस येतात आणि असे दिवस आल्यावर ते त्यातून अलिप्त होतात. आणि यशाचे श्रेय दुसऱ्याला देवून मोकळे होतात. आपण त्या पथावरचेच एक पथिक आहोत याचे स्मरण या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले असेलच!
तिसरे महत्त्वाचे संघावर टीका करणाऱ्यांसाठी हे एक आवाहन आहे आणि आव्हान पण आहे. समाज जीवनात माणसामध्ये अशा प्रकारची विरक्त मनोवृत्ती निर्माण करण्याचे आव्हान आहे आणि हे जमत नाही हे कबुल केले तर आवाहन आहे की या आणि संघाची कार्य पद्धती समजून घ्या. विचारात मतभेद असतील पण अशा प्रकारची समरपितविरक्त वृत्ती ज्या विचारातून जन्माला येते तो विचार निश्चितच तेव्हढा प्राकृत असणार आहे हे मान्य करा. या विषयावर debate करा.
आजच्या घडीला करीयर साठी धडपडणाऱ्या तरुणाईचा जगात अनेक असे तरुण सर्व सुखाला लाथ मारत विरक्तीच्या रस्त्यावर प्रचारक जीवन जगत आहेत. त्यांची संख्या दिवसां गणिक कमी न होता वाढते आहे. अशा प्रचारक परंपरेतील ज्येष्ठ प्रचारक माननीय रामलाल जी आहेत. ते काल ही प्रचारक होते आज ही असणार आहेत
फक्त व्यवस्था म्हणून काही दिवस एक काम सोपवले ते त्यांनी केले.
आणि विनंती केली पुन्हा संघाच्या काम करण्याची .
संघात सहज पणे जे असते ते संघ न समजणाऱ्या ना अप्रूप असते.
आणि टीकाकारांना तर समजून घ्या याचेच नसते. माननीय बाबा भिडे नेहमी म्हणायचे प्रचारक म्हणजे पत्ता न टाकलेले पोस्ट कार्ड! याची प्रचिती आज आल्याशिवाय राहत नाही. कर्तबगार प्रचारक वेगवेगळ्या क्षेत्राला आवश्यक ते नुसार देणे आणि तेथील मार्गी लागले की परत मूळ काम अथवा अन्य क्षेत्रात पाठवणे हे स्वाभाविकपणे संघ जीवनात घडत असते. राजकीय पक्ष म्हंटले की त्याची चर्चा अधिक होते एवढेच!
आज या निमित्ताने पुन्हा नानाजी देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. राजकारणाच्या अत्युच्च शिखरावर असताना साठ वर्षानंतर निवृत्तीचे, आपण केलेले राजकारण्यांना आवाहन, याचाशी प्रामाणिक राहत पुढे तीस पस्तीस वर्ष समाजसेवेत त्यांनी स्वताला झोकून दिले.
तीच ही परंपरा आहे ! डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या या यात्रेतील हे सगळे यात्रिक समाजात जाण्याचा आपला ध्यास सोडणार नाहीत. त्यातून होणाऱे राजकीय परिवर्तन हा एक स्वाभाविक टप्पा समजून त्यात गुंतून न राहता आपली यात्रा चालूच ठेवतील भारत मातेला गौरव स्थानी पोहचे पर्यंत!

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *