ती रात्र माध्व हिंदू धर्मासाठी काळरात्र ठरली.कर्नाटकातील हंपी जवळ १३ व्या शतकातील श्री व्यासराज नववृंदावन समाजकंटकांनी फोडले.

नंतर मठातर्फे शुद्धीसाठी संप्रोक्षण होम करण्यात आले.
हजारो स्वयंसेवकांनी एकजूटीने कडक सोवळ्यात निर्जळी उपवास करून भव्य वृंदावन पुनर्निर्माण केले.

असे हल्ले होतात कसे?

इतकी हिम्मत होतेच कशी?

हे इतर प्रार्थनास्थळांबाबत झाले असते तर प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया कशी असते?

मग ती आज इतकी सौम्य का?

इतके होऊन ही विचलित न होता,अविचारी कृत्य न करता शांततेने हिंदूंनी पुनर्निर्माणाचे कार्य केले,तरीही आम्हाला असहिष्णु म्हणणार?

कोण कुठे,कोणाचा अपमान,मारहाण झाली, केस हरवला,चित्र काढले म्हणुन रस्त्यावर उतरणारे समाज,यांना शांतीदुत म्हणणारे फुरोगामी,ना हिंदूंच्या भुमिकेचे कौतुक करेना नातोडफोडीचा निषेध करेनात.

अपेक्षाच चुकीची आहे.
मग एक प्रश्न मनात येतो,लोकशाही वगैरे ठिक आहे,पण एक #हिंदूं चा धाक हवा कि नको?

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *